Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आर. के. विद्यालयाची जानकी वृद्धाश्रमास भेट



 आर. के. विद्यालयाची जानकी वृद्धाश्रमास भेट 

 विद्यार्थ्यांच्यात संस्कार रुजवण्यासाठी सेवा भेट 
      दत्तवाड----   राजापूर खिद्रापूर हायस्कूल, राजापूरवाडी चे विद्यार्थी व शिक्षक यांनी आज जानकी वृद्धाश्रम , घोसरवाड ला भेट दिली.  वृद्धाश्रमाचे चेअरमन बाबासाहेब  पुजारी यांनी तेथील वृद्ध व काही तरुण लोकांची कैफियत मांडली. रक्ताच्या नात्यातील लोकांनीही रस्त्यावर सोडलेल्या अनाथांना जानकी वृद्धाश्रम आज सांभाळत आहे. त्यांची सेवा करीत आहे. ज्यांची मुले आज उच्च पदावर आहेत. ज्यांची मिळकत जास्त आहे अशांनी देखील आपली आई ,वडील , भाऊ यांना वाऱ्यावर सोडले. त्यांची जीवन कहाणी ऐकताना सर्वांचे डोळे पाणावले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून त्या वृद्धांसाठी खाऊ वाटप देण्यात आले. तसेच तेथील सुरू असलेल्या बांधकामासाठी पाच पोती सिमेंट  मुख्याध्यापक  काटकर जे. ए. यांनी  दिले. आजच्या तरुण पिढीमध्ये मूल्ये रुजवण्याची गरज आहे. सर्वांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी व सर्व मुलांनी आपल्या पालकांप्रती आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करावे त्यांची सेवा करावी म्हणजे वृद्धाश्रमच बंद पडतील. अशी अपेक्षा . पुजारी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी  पत्रकार  मिलिंद देशपांडे    मुख्याध्यापक . काटकर जे. ए.  मनोगत व्यक्त  केले.
 प्रथम मिचकर यांनी भेटीचा उद्देश स्पष्ट केला 
 याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.