प्राथमिक शिक्षक बँकेच्या स्वीकृत संचालक निवडीबद्दल सुरेश पाटील यांचा सत्कार.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या स्वीकृत संचालक निवडीबद्दल सुरेश पाटील यांचा सत्कार.
शिरोळ :
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या स्वीकृत संचालकपदी सुरेश भूपाल पाटील (दानोळी)यांची निवड झालेबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व क्षारपड मुक्तीचे जनक,उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी कारखान्याचे सेक्रेटरी शिंदे,चिफ इंजिनीयर माने,राजाराम सुतार,अमोल देसाई उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती कन्या वि.मं.उदगावच्या वतीने अध्यक्ष व सदस्य, कन्या विद्या मंदिर उदगावच्या वतीने शिक्षकवृंद व विद्यार्थी,केंद्र चिपरीच्या वतीने केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधवर व आण्णा मुंडे,चिपरी बीटच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे व साने गुरुजी पतसंस्थेच्या वतीने चेअरमन अरविंद मजलेकर व व्हा.चेअरमन मेहबूब मुजावर यांचे हस्ते व संचालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
श्री सुरेश भूपाल पाटील हे कन्या विद्या मंदिर उदगावचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.शिरोळ तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष, शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष, ऋणानुबंध शैक्षणिक मंच इचलकरंजीचे उपाध्यक्ष तसेच साने गुरुजी शिक्षक पतसंस्था जयसिंगपूरचे संचालक म्हणूनही कार्यरत आहे.त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.