Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आदिनाथ चौगुले व ओंकार कुंभार यांचा सत्कार गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले यांचे हस्ते करण्यात आला.

 


दत्तवाड 

आदिनाथ चौगुले व ओंकार कुंभार यांचा सत्कार गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले यांचे हस्ते करण्यात आला. 



     श्री नृसिंह सरस्वती महिला सहकारी दूध संस्था चे संस्थापक सचिव आदिनाथ चौगुले हे सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल तर सीमा सुरक्षा दल यामध्ये भरती झाल्याबद्दल ओंकार कुमार कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. 

          यावेळी चौगुले म्हणाले की ,आदिनाथ चौगुले हे सुरुवातीपासून दूध व्यवसायात असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेला झाला संस्थेला जास्तीत जास्त चांगले दूध घालणारे सभासद मिळाले आदिनाथ चौगुले यांनी संस्थेचा कारभार चांगला ठेवून सभासदांना उत्कृष्ट सेवा दिली. यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेला होणार आहे.

        तर ओंकार कुंभार यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून कुंभार घराण्यात असलेली देशसेवेची परंपरा पुढे सुरू ठेवली असून याचा सर्वच विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे ते म्हणाले

       यावेळी चंद्रशेखर मोहिते, सक्काना सिदनाळे, प्रकाश पाटील, भैय्या चौगुले, कुमार कुंभार, हेमंत जोशी यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद उपस्थित होते.