दत्तवाड उपसरपंच पदी रफिक मुल्ला यांची निवड
दत्तवाड -
दतवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रफिक मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच संजय पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते.
रफिक मुल्ला यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाला होता. मुदतीत एकच अर्ज जमा झाल्याने रफिक मुल्ला यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अकबर काले, संजय पाटील ,नाना नेजे, रूपाली पोवाडे अनिता कडाके काशीबाई केंगारे, मनीषा चौगुले, यांच्यासह बबनराव चौगुले ,डी एन सिदनाळे, नूर कले, सुरेश पाटील, बाळासो शिंदे, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



