टाकळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात प्रारंभ
उपप्राचार्य डॉ. सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
दत्तवाड
स्मार्ट चाम्प इंग्लिश मीडियम स्कूल कुरुंदवाड , टाकळी इंग्लिश मीडियम स्कूल सैनिक टाकळी यांच्या क्रीडा स्पर्धेस उत्साहात सैनिक टाकळी येथे प्रारंभ झाला. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कुरुंदवाड चे माजी उपनगराध्यक्ष व एस के पाटील कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गजानन मोहिते अजित ,पाटील, संदीप पाटील ,चेअरमन विजय गवंडी, मिलिंद देशपांडे , राजश्री गवंडी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम स्वागत व प्रस्तविक अमृता माळी यांनी केले, पाहुण्यांचा परिचय नितीन कोरे यांनी करून दिला तर विद्यार्थ्यांना शोभा कोळी यांनी क्रीडा शपथ दिली. आभार स्वप्नाली पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा मॅडम यांनी केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.