Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

**खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू बाबासाहेब वनकोरे यांची भारत दूरसंचार निगम बीएसएनएलच्या कोल्हापूर, विभाग सल्लागार समिती सदस्य पदी निवड **

 


**खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू बाबासाहेब वनकोरे यांची भारत दूरसंचार निगम बीएसएनएलच्या कोल्हापूर विभाग  सल्लागार समिती सदस्य पदी निवड **

माजी खा.निवेदिता माने व खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू सहकारी टाकळी वाडीचे सुपुत्र श्री.बाबासाहेब वनकोरे यांची भारत संचार निगम लिमिटेड घ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाली आहे.

 वनकोरे हे गेली वीस वर्ष राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच या पदावर काम केले आहे. तर त्यांना गेली पंधरा वर्षाचा दूरसंचार विभागातील तंत्रज्ञानाचा अनुभव आहे.

याचा विचार करून खासदार धैर्यशील माने यांनी या समितीवर त्यांची नेमणुकीची शिफारस केली त्यानुसार त्यांची निवड झाली असून यामध्ये कोल्हापूर ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने, खासदार नारायण राणे खासदार शाहू छत्रपती महाराज हे समितीचे प्रमुख असतात या समितीवर सल्लागार समिती सदस्य पदी बाबासाहेब वनकोरे यांची निवड झाली आहे. 

या निवडीबद्दल टाकळीवाडी व पंचक्रोशीतील व परिवर्तन आघाडी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खुशाल कांबळे,, पि.मो. जमादार ,चंद्रकांत निर्मळे,,वसंतदादा गोरे, बजरंग गोरे, रामा बेडक्याळे, बापू कोळी, धनपाल कोथळी, महादेव खोत, बाहुबली पाटील, सुनील चिगरे, आनंदा उन्हाळे, आप्पासो बस्तवाडे, अभी कोळी ,विठ्ठल निर्मळे(ङ्रा ) अविनाश वनकोरे, धनपाल भमाणे,मंजू भमाणे, संपादक रमेश बिरणगे,कल्लापा नेमू चिगरे,राजू जुगळे,यांच्यासह विविध संस्थेची पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.