*स्व.ध.बा.चौगुले गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर अकिवाट येथे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न*...
*स्व.ध.बा.चौगुले गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर अकिवाट येथे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न*...
श्री बाहुबली विद्यापीठ संचलित, स्व. ध.बा.चौगुले गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर,अकिवाट येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माता पालकांनी या स्पर्धेसाठी तृण धान्यांपासून अनेक पौष्टिक व रुचकर पदार्थ बनवले होते. या स्पर्धेसाठी माता पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.
या स्पर्धेतील यशस्वी माता पालक आहेत,प्रथम क्रमांक सौ. आर्थिका अनिल रायनाडे,द्वितीय क्रमांक सौ. जयश्री सुधाकर इंगळे व सौ.शोभा बाळासो सूर्यवंशी, तृतीय क्रमांक सौ. पल्लवी अमित कोरे व सौ. अश्विनी विपुल पल्लके,चौथा क्रमांक सौ. पल्लवी सुरज माने व सौ. पल्लवी राहुल पाटील,पाचवा क्रमांक सौ. नयन अमित पाणदारे व उत्तेजनार्थ - सौ. अश्विनी महेश पाणदारे आणि सौ. प्रतिभा नितीन बावडेकर. या स्पर्धेचे परीक्षण श्री. एम. बी. पाटील सर व सौ. ए. एम. करडे मॅडम यांनी केले. या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.व्ही. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
