श्री विद्यासागर हायस्कूल संस्कार घडणारी शाळा आहे - संजय पाटील
श्री विद्यासागर हायस्कूल संस्कार घडणारी शाळा आहे - संजय पाटील
येथील श्री विद्यासागर हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये बसणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय बाबगोंडा पाटील व विशाल रघुवीर आवटी, अरुण दादासो कल्लणावर, बाबासाहेब (बंटी)रायनाडे, अश्विनी अमोल चौगुले, शशिकला बाबासो रायनाडे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे चेअरमन कमलाकर चौगुले हे होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय किशोर पाटील यांनी केला याप्रसंगी विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून सोहम सनथ कुमार कोथळी तर आदर्श विद्यार्थिनी श्रावणी अमोल चौगुले यांची निवड झाली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले प्रसंगी इयत्ता दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपला शाळेतील अनुभव व अध्यापकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व उज्वल यश मिळवून सर्वजण उत्तीर्ण होऊ अशी ग्वाही दिली याप्रसंगी वर्गाध्यापक स्वागत पाटील ,व जे एस गीताजे यांनी मनोगत व्यक्त केले .
प्रमुख पाहुणे संजय बाबगोंडा पाटील यांनी आपल्या मनोगत बाहुबली विद्यापीठाचे विद्यासागर हायस्कूल हे समंतभद्र महाराज यांनी स्थापन केलेले संस्कार घडवण्याचे विद्यापीठ आहे असे सांगितले याप्रसंगी सर्वच प्रमुख पाहुणे यांनी आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यासागर हायस्कूल ही शाळा मुलांची काळजी घेणारी गुणवत्तेला वाव देणारी कलागुणांना वाव देणारी असे विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य देणारी शाळा आहे ते सांगितले कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक महावीर पाटील यांनी मानले . याप्रसंगी शालेय समितीचे सर्व सदस्य मुख्याध्यापक दादासो वाडकर सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
