दत्तवाड येथील रुकसाना नदाफ यांना राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
दत्तवाड येथील रुकसाना नदाफ यांना राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
दतवाड ( मिलिंद देशपांडे)
येथील केंद्रीय कन्या शाळाच्या विद्यार्थीप्रिय अध्यापिका सौ रुकसाना बशीर नदाफ यांना यावर्षीचा राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात यावर्षीचा राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार दत्तवाड तालुका शिरोळ येथील कन्या केंद्रीय शाळा दत्तवाड येथील अध्यापिका रुकसाना बशीर नदाफ यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे येथील बसवेश्वर नगर यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



