कु. सिद्धी पाटील समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम
कु. सिद्धी पाटील समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम
दत्तवाड
कुरुंदवाड येथील ॲड. शितल डी पाटील यांची कन्या कुमारी सिद्धी पाटील समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
2024- 25 या वर्षात घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच लागला यात सिद्धी पाटील हिने 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धी पाटील ही दत्तवाड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री एन एस पाटील यांची नात आहे यामुळे तिचे दत्तवाड परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
