Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल आदिती जोशी हिचा सत्कार

 


न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल आदिती जोशी हिचा सत्कार

दत्तवाड - सर्वात कमी वयात न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल दत्तवाड तालुका शिरोळ येथील आदिती जोशी हिचा सत्कार गुरुदत्त संचालक बबनराव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. 

 आदिती जोशी हिने कमी वयात परीक्षा देऊन न्यायाधीश पदी निवड झाली ती एलएलएम झाली असून नेट सेट उत्तीर्ण आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून गुरुदत्त संचालक बबनराव चौगुले यांनी तिला शुभेच्छा देत तिचा सत्कार केला तिचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा अशी ही ते म्हणाले तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी अशोक नेर्ले, अजित वठारे यांनीही शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पत्रकार मिलिंद देशपांडे, आदितीच्या आई वडील, काका काकू, आत्या यांच्यासह कुटुंबीय हजर होते.