*दत्तवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश*
*दत्तवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश*
दतवाड ता. शिरोळ येथील परिवर्तन प्राथमिक शाळेच्या एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा यावर्षी कायम राखली आहे.
इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी सौम्या अनिल नांगनुरे हिने 180 पैकी 135 गुण मिळवून शिरोळ तालुक्यात पाचवा क्रमांक तर कुरुंदवाड परीक्षा केंद्रा तिसरा, दत्तवाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच हुमेरा तौसीफ नदाफ, श्रेयस बाहुबली मगदूम ,श्रेया रवींद्र पाटील, अनुजित शितल सूर्यवंशी, यांची निवड झाली आहे तर सारथी शिष्यवृत्तीसाठी शिवतेज सुनील पलसकर यांची निवड झाली आहे यांना प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक डी बी मगदूम, मुख्याध्यापक पी पी खोत वर्गशिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य श्री ऋषिकेशानंद महाराज, सचिव बबन चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे दतवाड व परिसरातून कौतुक होत आहे.


