पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदावर विराजमान – आदिती जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास
पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदावर विराजमान – आदिती जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र न्यायिक सेवेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत आदिती जोशी यांनी १८वा क्रमांक मिळवत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात आणि अवघ्या २५व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले, हे अत्यंत गौरवपूर्ण आहे.
आदिती जोशी यांचे माध्यमिक शिक्षण नेजे हायस्कूल दत्तवाड तालुका शिरोळ येथे झाले. त्यांनी ११वी व १२वीचे शिक्षण डी. के. टी. ई. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे घेतले. कायद्याच्या क्षेत्रात आपले भवितव्य घडवण्याच्या दृढनिश्चयाने त्यांनी एन. एस. सोटी. लॉ कॉलेज, सांगली येथून बी.एस.एल. एल.एल.बी. ९२% गुणांसह उत्तीर्ण केले. यानंतर, त्याच कॉलेजमधून एल.एल.एम. ७४% गुणांसह पूर्ण करून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. विशेष म्हणजे, एल.एल.एम.करत असतानाच त्यांनी पाच वेळा UGC-NET परीक्षा तसेच महाराष्ट्र SET परीक्षा उत्तीर्ण केली होती. व तसेच मुक्त विद्यापीठ नाशिक मधून बीए सायकॉलॉजी आणि एमबीए मधून पूर्ण केले आहे . तसेच एमबीए मधून सुद्धा त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या त्या आय एल एस लॉ कॉलेजमध्ये पीएचडी करत आहेत.एवढ्या कमी वयात इतकी मोठी शैक्षणिक कामगिरी करणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे.
त्यांच्या या यशस्वी प्रवासात प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांचा महत्त्वाचा वाटा आहे, वडील अशोक जोशी यांनी शिक्षणासाठी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाले .
या यशाच्या प्रवासात त्यांना अॅड. मल्लिकार्जुन पुजारी आणि प्रो. मानसिंग बिसुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

