निसर्ग ,समाज व अर्थकारण याचा मेळ घातला तर जीवन सुंदर आहे - प्रा. गणेश शिंदे
निसर्ग ,समाज व अर्थकारण याचा मेळ घातला तर जीवन सुंदर आहे - प्रा. गणेश शिंदे
दत्तवाड --- परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आपणही तो शिकला पाहिजे परंतु निसर्गाशी जुळवून घेऊन समाजाच्या बरोबर राहून नाते जपून अर्थकारण केल्यास जीवन सुंदर व सुखी आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले
ते हेरवाड ता. शिरोळ येथे उत्कर्ष सोशल फाउंडेशन व शेतकरी उद्योग समूह यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.
शिंदे यांनी अनेक उदाहरणे देऊन शेतकरी सुखी झाला पाहिजे तरच समाज सुखी होईल. मानवाजवळच सुख आहे परंतु तो इतरत्र ते शोधत असल्यामुळे दुःखी होत आहे त्यामुळे निसर्गाच्या जवळ जाऊन, नाती जपून, अर्थकारण केल्यास माणूस सुखी होणार असे सांगितले. त्यावेळी त्यांनी आजीची गोष्ट व राणी मला गाव सुटेना या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेका धरला.
प्रथम उत्कर्ष सोशल फाउंडेशन चे उद्घाटन कुरुंदवाड चे प्रसिद्ध वकील विजय जगदम्नी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत सचिन पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मारुती थरकार यांनी केले सुकुमार पाटील यांनी प्रा .गणेश शिंदे यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमास विजय जगदम्नी, सरपंच रेखा जाधव, पोलीस पाटील दिलीप पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाज जमादार ,केशव हेरवाडे, यांच्यासह उत्कर्ष सोशल फाउंडेशन चे सर्व सभासद, शेतकरी उद्योग समूहाच्या सर्व शाखा चे चेअरमन ,व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

