पत्रकार मुन्नाभाई नदाफ बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
पत्रकार मुन्नाभाई नदाफ बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
दै. पुण्यनगरीचे निर्भीड पत्रकार आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक मुन्नाभाई महंमद नदाफ (दत्तवाड) यांना बसव धर्मपीठ कुडलसंगम ट्रस्टचे 'जगद्गुरु अल्लमप्रभू योगपीठ, आळते' यांच्यातर्फे दिला जाणारा 'बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बसव धर्म पीठ कुडलसंगम ट्रस्टचे जगद्गुरु आलमप्रभू योगपीठ यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. आलमप्रभू योगपीठ आलमगिरी डोंगर जिल्हा, कोल्हापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी देश- विदेशातील नामवंत लिंगायत धर्मगुरू, संत, समाजसेवक, साहित्यिक आणि मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.
सामाजिक समतेचे, बंधुभावाचे आणि निर्भीड पत्रकारितेचे त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुन्नाभाई नदाफ हे गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण प्रश्न, सामाजिक न्याय, धार्मिक सौहार्द आणि शेतकऱ्यांचे मुद्दे सातत्याने वृत्तपत्रांतून मांडले आहेत. त्यांची लेखणी ही नेहमीच सत्याचा पाठपुरावा करणारी आणि वंचितांचा आवाज बनलेली आहे. त्यामुळेच ते सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

