Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पैसे खाण्याच्या उद्देशानेच जादा दराने टेंडर: धनाजी चुडमुंगे


 जादा दराने टेंडर देऊन शिरोळ नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचा 5 वर्षात 6 कोटींचा ढपला 

पैसे खाण्याच्या उद्देशानेच जादा दराने टेंडर: धनाजी चुडमुंगे

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला विरोधकांची गप्प बसून इमाने इतबारे साथ 

शिरोळ: शिरोळ नगरपरिषद मधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विकास कामाचे ठेके देताना जवळपास प्रत्येक टेंडर सरासरी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 5% जादा दराने देऊन 5 वर्षात 6 कोटींचा ढपला पाडला असून मतं देऊन निवडून दिलेल्या शिरोळ करांचा हा विश्वासघात असल्याचा आरोप आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला.


शिरोळ नगरपरिषद ने विकास कामात केलेल्या गैरकारभारा संदर्भात त्यांनी काल शासकीय विश्रामग्रह शिरोळ येथे पत्रकार बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितले की 2018/19 ते 2022/23 या 5 वर्षाच्या कार्यकाळात शासनाने विविध योजना साठी शिरोळ नगरपरिषद ला 166 विकास कामासाठी अंदाजे 125 कोटींच्या आसपास निधी मंजूर केला होता. त्या निधीतून नगरपरिषद ने टेंडर देताना काही अपवाद वगळता बहुतेक सर्व टेंडर अंदाजपत्रका पेक्षा सरासरी 5% जादा दराने दिली आहेत. कल्लेश्वर तलाव  सुशोभीकरणाच्या कामाचे टेंडर तर 6% जादा दराने दिले असून आणखी काही टेंडर तर 7% पेक्षा जादा दराने देऊन मोठा ढपला पाडला आहे.

शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या कडे 5 वर्ष एकहाती सत्ता होती त्यांनी आपल्या कार्यकाळात अंदाज पत्रकीय रक्कमे पेक्षा जादा दराने टेंडर दिली आहेत पण त्यांच्या कार्यकाळानंतर नगरपरिषद मध्ये प्रशासकांनी कारभार स्विकारल्यावर  मात्र नगरपरिषद ने सगळी टेंडर 10%,15% 4%  कमी दराने दिली असल्यामुळे आपल्याच नगराध्यक्ष नगरसेवकांनी जनतेला पद्धतशीर फसवल्याचे स्पष्ट होते आहे.

शिरोळ च्या नागरिकांनी मागच्या निवडणुकीत पाटील गटाला सत्ता दिली असली तरी त्यांच्या विरोधात म्हणून यादव गटाचे तितकेच नगरसेवक निवडून दिले होते. सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्टाचाराला विरोधी नगरसेवकांनी सभागृहात कुठेही आक्षेप घेतलेला दिसत नसल्याने तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे कारण या जादा दरांच्या टेंडर ला त्यांनी जनरल सभेच्या वेळीच हरकत घेतली असती तर त्यांना ही सर्व टेंडर जादा दराने देता आली नसती.

प्रशासकाच्या काळात 10 लाखाचे काम  9 लाखात झाले. टेंडर घेणारे ठेकेदार तेच पण नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मात्र त्याच 10 लाखाच्या कामाला 10 लाख 50 हजार रुपये दिले. म्हणजे 10 लाखाच्या कामात जवळपास 1 लाख 50 हजार रुपयांचा ढपला आपणच निवडून दिलेल्या नगराध्यक्ष नगरसेवकांनी पाडला असल्याचे कागदपत्रावरून दिसत आहे त्यामुळे या संपूर्ण ढपल्याची तक्रार मा जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही काही दिवसात करणार आहोत.


कल्लेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे अगदी गाजावाजा करून काम केले होते हे सगळे काम 4 कोटी 90 लाखाचे होते हे काम ठेकेदारास देताना 6% जादा दराने देऊन या एकाच कामात 30 लाखाचा ढपला सत्ताधारी आणि विरोधी सगळ्यांनी मिळून पाडला असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.