श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व नवीन पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा यांच्यावतीने पारंपारिक दिंडी सोहळ्याचे आयोजन
दत्तवाड -
येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व नवीन पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा यांच्यावतीने पारंपारिक आषाढी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात गावातील पंढरपूर येथे आषाढी वारीला गेलेल्या वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
नुकतीच आषाढी वारी झाली त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे व पंढरपुरात येथील विठ्ठल रुक्माई यांचे महत्त्व कळावे व आपली पारंपारिक दिंडीची संस्कृती कळावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध पारंपारिक गाणी अभंग यावर नृत्य केले फुगडी चा फेरा धरून विठ्ठल नामाचा जय जयकार करत गांधी चौक बस स्थानक या प्रमुख मार्गावर दिंडी सोहळा करण्यात आला.
लहान गटापासून बारावीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून दिंडीत सहभागी झाले होते त्यामुळे लहान विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा मध्ये उठून दिसत होते.
शाळेचे चेअरमन शीतल नेजे, प्राथमिक शाळेचे चेअरमन अजित चौगुले यांच्यासह शाळेचे स्थानिक पदाधिकारी मुख्याध्यापक संजय तावदारे,पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत मालगावे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

