Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

मनोहर भोसले यांच्या ' मक्याची कणसं ' कथासंग्रहाचे प्रकाशन

 


मनोहर भोसले यांच्या ' मक्याची कणसं ' कथासंग्रहाचे प्रकाशन

दत्तवाड:प्रतिनिधी :सैनिक टाकळी ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील लेखक मनोहर भोसले यांच्या बहुचर्चीत 'मक्याची कणसं ' या कथासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या 'किशोर ' मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले.

पुणे येथील कार्यालयात झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी कोल्हापूर जिल्ह्याच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत पाटील होते.

मनोहर भोसले यांचा इयत्ता ५ वी च्या बालभारती पाठ्यपुस्तकात 'कठीण समय येता 'या शीर्षकाचा पाठ आहे.'लेखक आपल्या भेटीला ' या उपक्रमाच्या माध्यमातून भोसले यांनी केलेल्या कार्याचे किरण केंद्रे यांनी कौतुक केले.यावेळी जेष्ठ साहित्यिक व  प्रकाशक चंद्रकांत निकाडे,मुंबई येथील आदर्श शिक्षक सुनिल मस्कर,मराठी बालकुमार साहित्य सभेच्या कार्यकारणी सदस्या सौ.गीता पाटील इचलकरंजी आदीसह मान्यवर उपस्थित होते.