Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आई वडिलांचा मानसन्मान ठेवा-बाबासाहेब पुजारी श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला

 


आई वडिलांचा मानसन्मान ठेवा-बाबासाहेब पुजारी

श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला

दत्तवाड:प्रतिनिधी : जन्म मृत्यूच्या कालावधीत पुण्याचे काम करा.हे पुण्य आई वडीलांच्या पायाशी आहे.आयुष्यभर कष्ट केलेल्या लोकांनी उत्तरार्धात चांगले वागा.सर्वांशी प्रेमळपणाने वागा.कुटुंबातील वयस्कर लोकांची सेवा करून आई वडिलांचा मान -सन्मान ठेवण्याचे आवाहन श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित श्रावणमासा निमित्त कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथील 'युवक,ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिकता' या विषयांवरील व्याख्यान बाबासाहेब पुजारी (संस्थापक संचालक -जानकी वृद्धाश्रम घोसरवाड)बोलत होते.अध्यक्ष स्थानी प्रशांत मगदूम होते.स्वागत व पाहुण्यांचा परिचय सच्चिदानंद आवटी यांनी करुन दिला.

         ते पुढे म्हणाले की मुलांनी आपल्या वयस्कर आई वडीलांची काळजी घेतल्यास वृद्धाश्रम बंद पडतील.मुलांनी जेष्ठांचा मानसन्मान ठेवल्यास तुम्हाला काही कमी पडणार नाहीत.जेष्ठांनीही आपला इगो बाजूला ठेवून सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची गरज आहे.

        याप्रसंगी शंकर मेंगे,स्वप्नील कुंभार,शिवाजी भोसले,एकनाथ आळवणे, प्रकाश फल्ले,मल्लू मिरजे,महादेव माळी,किशोर खोत, रामचंद्र आंबी,बाळू हलवाई,पार्वती हट्टी,शकुंतला आवटी,शोभा माळी,कमल तोडकर,गंगुबाई लाटकर,सुजाता हलवाई,आक्काताई जोंग,विजया आवटी यांचे सह समाज बांधव,नागरीक उपस्थित होते.