दत्तवाडात प्रथमच गणरायावर हेलिकॉप्टरातून पुष्पवृष्टी
दत्तवाडात प्रथमच गणरायावर हेलिकॉप्टरातून पुष्पवृष्टी
रौप्य महोत्सवी श्री दत्त गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
दत्तवाड:प्रतिनिधी : दत्तनगर,दत्तवाड येथील श्री दत्त गणेशोत्सव मंडळ यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त २६ ऑगस्ट२०२५ रोजी गांधी चौकातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य आगमन सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी हेलिकॉप्टरातून गणरायांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
भव्य आगमन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, रविराज फडणीस(सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड),प्रमोददादा पाटील (संस्थापक अध्यक्ष छत्रपती ग्रुप), रणजितसिंह पाटील (युवानेते,शिरोळ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त होम मिनिस्टर,झिम्मा फुगडी,रक्तदान, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.