Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळांचा कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

 


  धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळांचा कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

मंडळाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक 

घोसरवाड (वार्ताहर) घोसरवाड ता शिरोळ येथील घोसरवाडचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर छत्रपती शंभूराजे  मंडळाने  कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा व   धार्मिक व  पारंपरिक तसेच सामाजिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे 

येथील धर्मवीर छत्रपती शंभूराजे गणेश मंडळ प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करतात अत्यंत धार्मिक व पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात त्यामुळे त्यांनी तमाम भाविक भक्तांची मने जिंकली आहेत आकर्षक स्टेज सजावट विविध प्रकारची रोषणाई अत्यंत चांगल्या प्रकारे करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी देखील मंडळाने कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच  धार्मिक व ऐतिहासिक व व सामाजिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा व आकर्षक स्टेज सजावट व विविध प्रकारची रोषणाई व धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असुन या निर्णयाने त्यांनी एक आदर्श घालून दिला असल्याची परीसरात चर्चा सुरू आहे.



कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मा. श्री रविराज फडणीस साहेब व कुरुंदवाड पोलिस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शितल पुजारी यांनी  यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यासाठी धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळाचे प्रमुख व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शितल पुजारी. सुशांत कोकणे.अमोल नरदे. रोहित कोकणे.जयसिंग शिंदे .  यांचेसह मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.