हेरवाड आरोग्य उपकेंद्राचे कार्य आदर्शवत : रेखा जाधव
हेरवाड आरोग्य उपकेंद्राचे कार्य आदर्शवत : रेखा जाधव
महिन्यात ४ प्रसूती,विनम्र स्टाफ.
दत्तवाड:प्रतिनिधी : मानवाच्या महत्वाच्या मूलभूत सुविधापैकी आरोग्य ही एक महत्वाची बाब आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये आमूलाग्र बदल होत आहे.कोल्हापूर जिल्ह्या बरोबरच शिरोळ तालुक्यात ही आरोग्य सेवा उत्तमपणे चालू आहे. सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य अविरतपणे चालू आहे. त्यापैकीच हेरवाड उपकेंद्र हे आरोग्य सेवेमध्ये अतिशय कौतुकास्पद कार्य करीत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन सरपंच सौ.रेखा जाधव यांनी केले.
जन आरोग्य समितीच्या सभेमध्ये महिला प्रसूती सेवेत महिन्यात ४ प्रसूती करून उत्तम सेवा आणि इतर रुग्ण सेवेचे कार्य केले.त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.पुढील काळात ही आरोग्य स्टाफ कडून रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.गटविकास अधिकारी नारायण घोलप,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राच्या सुपरवायझर,सर्व आशाताई यांचे देखील कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वंदना गिरमल,आरोग्य सेविका श्रीमती मनीषा पंढरपूरे,सारिका टेळे,शिंदे सिस्टर या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. उल्लेखनीय आरोग्य सेवेबद्दल हेरवाड ग्रामपंचायत व समस्त हेरवाडकरांच्या वतीने ग्रामसभेत ही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
यावेळी अ.लाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कदम साहेब,आरोग्य सहाय्यक सुभाष यादव,अनिल गवळी,उपसरपंच भरत पोवार,ग्रामसेविका पल्लवी कोळेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य,जन आरोग्य समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते.
