घोसरवाड येथील कुमार विद्या मंदिर या शाळेस माजी विद्यार्थी निखिल जुगळे यांच्या सहकार्याने अद्ययावत RO सिस्टीम प्रदान
घोसरवाड येथील कुमार विद्या मंदिर या शाळेस माजी विद्यार्थी निखिल जुगळे यांच्या सहकार्याने अद्ययावत RO सिस्टीम प्रदान
घोसरवाड (वार्ताहर) घोसरवाड ता शिरोळ येथील कुमार विद्या मंदिर या शाळेस माजी विद्यार्थी निखिल सुभाष जुगळे यांच्या सहकार्याने अद्ययावत RO सिस्टीम प्रदान करण्यात आला त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे
येथील कुमार विद्या मंदिर या विद्यालयात मंगळवार दि.
12 ऑगष्ट 2025 रोजी बेटली सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 250 एल पी एच चा अद्ययावत RO प्लांट बसविण्यात आला विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या उदांत हेतुने व यासाठी सतत प्रयत्नशील राहुन बेंटली सिस्टीम कंपनीमध्ये कार्यरत असणारे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी निखिल सुभाष जुगळे यांनी आपल्या प्रयत्नांतून शाळेसाठी सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे (1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे)अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध करून दिली . आपल्या गावातील मातृशाळा कुमार विद्या मंदिर घोसरवाड या शाळेप्रति असणारे प्रेम व उदरदायित्व हे निखिल जुगळे यांनी आपल्या कृतितुन दाखवून दिले आहे व इतरासमोर एक आदर्श घालुन दिलेला आहे
त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असुन निखिल जुगळे यांचे व बेंटली सिस्टीम इंडिया कंपनीच्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य व तसेच शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कमते व सर्व शिक्षक व विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ अमृता लखन खोत. उपाध्यक्ष सतीश चव्हाण. केंद्र प्रमुख सुभाष कुरुंदवाडे . मुख्याध्यापक दत्तात्रय कमते. राजु ढोणे.यांचेसह सर्व शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
