दत्तवाड़ात आरोग्य शिबीर संपन्न. रौप्यमहोत्सवी श्री दत्त गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
दत्तवाड़ात आरोग्य शिबीर संपन्न.
रौप्यमहोत्सवी श्री दत्त गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
दत्तवाड:प्रतिनिधी :यावर्षी राज्योत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाचा समावेश केलेला आहे.दरवर्षी मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक गणेशोत्सव मंडळे समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असतात. दत्तवाड येथील दत्तनगरच्या सरकार ग्रुपचा श्री दत्त गणेशोत्सव मंडळ यंदा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
आरोग्याचा श्रीगणेशा अभियाना अंतर्गत महात्मा जोतीराव फुले योजना लागू असलेले अकिवाट मधील श्री हॉस्पिटलचे डॉ.व्ही.एस.पाटील व ग्रामीण रुणालय दत्तवाड यांचे संयोजना ने सर्व रोग निदान आरोग्य शिबीर आयोजीत केले होते. यांमध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह,हृदयरोग तसेच डोळ्याची तपासणी,लॅबोरेटरी तपासणी तसेच योजनेमध्ये बसणारे आजार व ऑपरेशन या शिबिरांमध्ये निवड झालेल्यांवर उपचार श्री हॉस्पिटल मार्फत केले जाणार आहेत.
या वेळी श्री दत्त गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी उपसरपंच संजय पाटील,युवा नेते सुरज शिंगे,किरण पोवाडी,आकाश शिंगे, अरुण तराळ,सुशांत वाघे,अल्ताफ अपराध,प्रितम कोळी,बाबू वडर,समीर मुल्ला,संतोष आवटी यांचे सह मंडळाचे सदस्य,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
