Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सनी गणेशोत्सव मंडळाच्या भूत बंगल्याचे पंचक्रोशीत आकर्षण

 



सनी गणेशोत्सव मंडळाच्या भूत बंगल्याचे पंचक्रोशीत आकर्षण

प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान


दत्तवाड -

सनी गणेशोत्सव मंडळ यांनी बनवलेल्या भूत बंगल्याची चर्चा पंचक्रोशीत असून दत्तवाड सह इतर गावातील महिला युवक मोठ्या प्रमाणात भूत बंगला बघण्यासाठी दत्तवाड येथे येत आहेत. 

    येथील सनी गणेश उत्सव मंडळ यावर्षी रोपे महोत्सव वर्ष साजरे करत असून या नमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आली आहेत यात श्री चे आगमन विविध पारंपारिक वाद्य वेशभूषा केलेले विविध कलाकार अशा आकर्षक पद्धतीने करण्यात आले. राजवाडा पद्धतीने आकर्षक व सुरेख मंडप उभारण्यात आला आहे. यावर्षी त्यांनी भूत बंगला तयार केला असून ते आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे भूत बंगला बघण्यासाठी दत्तवाड सह घोसरवाड दोन्ही दानवाड टाकळी टाकळीवाडी राजापूर सह कर्नाटकातील सदलगा एकसंबा बोरगाव येथील महिला युवक मोठ्या प्रमाणात येत आहेत 

याबरोबरच रक्तदान शिबिर प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे आई वडील हेच दैवत हे व्याख्यान अशी विविध उपक्रम यावर्षी राबवत आहे.