दत्तवाड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोटर रॅलीचे आयोजन शासनाचा निषेध, आरक्षणाची जोरदार मागणी
दत्तवाड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोटर रॅलीचे आयोजन
शासनाचा निषेध, आरक्षणाची जोरदार मागणी
दत्तवाड -मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानात मनोज जरंगे पाटील आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दत्तवाड तालुका शिरोळ येथील सकल मराठा समाजाकडून गावातील प्रमुख मार्गावरून मोटर रॅली काढून पाठिंबा देण्यात आला
यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेसह आरक्षण न देणाऱ्या शासनाचा निषेध करण्यात आला.
गावातील प्रमुख मार्गावरून मोटर रॅली काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री गणरायाची आरती करून शासनाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरले.
शेवटी सर्व मोटर रॅलीधारक सकल मराठा समाज युवकांचे आभार रमेश खरपी यांनी मानले.
