Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आईबापाचे अश्रू ज्याला कळाले तोच खरा माणूस - प्रा.वसंत हंकारे रौप्यमहोत्सवी न्यू सनी गणेशोत्सव मंडळा वतीने व्याख्यानाचे आयोजन

 


आईबापाचे अश्रू ज्याला कळाले तोच खरा माणूस - प्रा.वसंत हंकारे

रौप्यमहोत्सवी न्यू सनी गणेशोत्सव मंडळा वतीने व्याख्यानाचे आयोजन

दत्तवाड:प्रतिनिधी : येथील दत्तवाडचा महाराजा न्यू सनी गणेशोत्सव मंडळ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे 'न समजलेले देव माणसं आई बाबा ' या विषयांवर प्रेरणादायी व्याख्यान झाले. व्याख्यानासाठी गांधी चौकात गर्दीचा उच्चांक मोडला.

       आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा, बापासाठीचे अश्रू,संघर्षातून यशाकडे आणि बरचं काही आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच चंद्रक्रांत कांबळे,पोलिस पाटील संजय पाटील यांचे सह न्यू सनी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते,श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.



ते पुढे म्हणाले की आई बाप समजून घेणे हेच मोठे जगातील शिक्षण आहे.देवमाणसाचा नाव आहे बाप.आई बाप कळाला नाही. मुलामुलींनीओळख विसरल्याने तुमच्यासमोर उभा आहे. सावित्रीबाई व फातिमाबी बनण्याची आज गरज आहे. दोन मार्क कमी पडली तर चालेल.बापाची उंची गाठता येणार नाही.ज्याला बाप समजला तोच आयुष्यात उभा राहील.

            जोपर्यंत आईबापाचा श्वास चालू आहे तोपर्यंत काळजी करा.लाखो करोडो रुपये देवाच्या चरणी ओतले तरी आईबाप मिळणार नाहीत.प्रारंभी आपल्या वक्तृत्व शैलीने हसवून करमणूक केले अन् शेवटी पालकांच्या समवेत मुलींना शपथ देतानाचा क्षण सर्वांच्या डोळयांत अश्रू आणणारा होता.

          भरकटणाऱ्या मुलांमुलींना आईबापाचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे प्रा.वसंत हंकारे यांनी समुपदेशनवजा मार्गदर्शन केले.या प्रबोधनपर व्याख्यान न्यू सनी गणेशोत्सव मंडळाने केल्या बद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे.