कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
महम्मद आसिफ मुजावर व सौ.अर्पणा परीट यांचा समावेश.
दत्तवाड:प्रतिनिधी :दिनांक ५ सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार सन २०२४-२५ व सन२०२५-२६ करिता जिल्हास्तरीय निवड समितीने जाहीर केली.
जिल्हयातील ,तालुक्यातील पात्र शिक्षकांकडून प्राप्त स्वयंमूल्यमापन प्रपत्रानुसार उच्च गुण प्राप्त शिक्षकांच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन बीटस्तर, तालुकास्तर तसेच तालुक्यांची अदलाबदल करून त्रयस्थ बाहय मूल्यमापन समितीच्या शिफारशी नुसार जिल्हास्तरावर पात्र प्रस्ताव समितीसमोर सादर केले.त्रयस्थ बाहय मूल्यमापन समितीमार्फत तपासणी करून दिलेले गुण हे फक्त आदर्श शिक्षक पुरस्कार पात्रता फेरीसाठी ग्राहय धरण्यात आले आहेत.जिल्हा निवड समितीमार्फत शिक्षकांची ५० गुणांची मुलाखत सादरीकरण याव्दारे गुणदान करुन अंतिम निवड करणेत आली.
सदर निवड प्रक्रियेमध्ये कार्तिकेयन एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. कोल्हापूर,डॉ.एल.एस.पाटील, प्राचार्य,शासकीय अध्यापक महाविद्यालय,कोल्हापूर,श्रीम.सुवर्णा सावंत,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षणतज्ञ डॉ.रघुनाथ कडाकणे, इंग्रजी विभाग प्रमुख,राजाराम महाविद्यालय कोल्हापूर,शिक्षण तज्ञ बी.बी.पाटील,मुख्याध्यापक,पी. एस. तोडकर हायस्कूल वाकरे ता. करवीर,डॉ.श्रीम.मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी संबंधित शिक्षकांची मुलाखत घेउन ५० गुणांचे गुणांकन करुन निवड यादी तयार केली.
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व उर्दू विद्या मंदिर घोसरवाड प्रशालेचे उपक्रमशील व विषय शिक्षक श्री.महम्मदआसिफ खलील मुजावर यांना सन २०२४-२५ चा जिल्हा परिषद कोल्हापूरचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.
कुमार विद्या मंदिर टाकवडे प्रशालेच्या उपक्रमशील अध्यापिका सौ.अर्पणा पोपट परीट यांना २०२५-२६ यावर्षीचा जिल्हा परिषद कोल्हापूरचा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. यांच्या निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

