दत्तवाड केंद्रस्तरीय दुसरे शिक्षण परिषद संपन्न.
दत्तवाड केंद्रस्तरीय दुसरे शिक्षण परिषद संपन्न.
दत्तवाड:प्रतिनिधी : २०२५-२६ शैक्षणिक सत्रातील दत्तवाड केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड येथे गुरुवार दि.४ सप्टेंबर२०२५ रोजी संपन्न झाली.
मागील शिक्षण परिषदेचा आढावा, देवाण - घेवाण व अध्ययन निष्पत्ती आधारीत मासिक नियोजन या विषयी सविस्तर मार्गदर्शन सौ.अर्चना अजित पाटील यांनी केले.
शासकीय योजना व उपक्रम,नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६, एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम या विषयी अशोक देवसो कोळी यांनी मार्गदर्शन केले.
तर हरित व स्वच्छ विद्यालय मूल्यांकन, स्थानिक प्रशासन व समुदाय सहभाग या विषयांबरोबरच प्रशासकीय सूचना व कामकाजाविषयी मार्गदर्शन केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक रविंद्र सिदनाळे यांनी केले. नंदकुमार मोटे यांनी आभार मानले.

