*प्रशांत पुजारी यांची महावितरण कंपनीच्या कोकण झोनमधील सिंधुदुर्ग परिमंडल वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्वतंत्र ग्राहक सदस्यपदी नियुक्ती*
*प्रशांत पुजारी यांची महावितरण कंपनीच्या कोकण झोनमधील सिंधुदुर्ग परिमंडल वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्वतंत्र ग्राहक सदस्यपदी नियुक्ती*
(प्रतिनिधी) :
महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातले एक अभ्यासू दिग्गज व्यक्तिमत्व, आपल्या निस्वार्थी कार्यामुळे अफाट जनसंपर्क निर्माण केलेले, कायदेविषयक व तांत्रिक जाण या सर्वांचे अद्वितीय मिश्रण असलेले प्रशांत शरदराव पुजारी, रा. गारगोटी, मुळ गाव नृसिंहवाडी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगामार्फत (MERC) कोकण झोन (सिंधुदुर्ग सर्कल) येथील वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या (CGRF) ज्युडीशियल सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यानी पदभार स्वीकारला.
त्यांच्या या नियुक्तीने भुदरगड तालुक्यासह गारगोटीकर आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
यापूर्वी त्यांनी चार जिल्ह्यांचे एकत्रित असलेल्या कोल्हापूर झोनच्या CGRF सदस्यपदावर असताना हजारो वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करून न्याय्य तोडगे दिले आहेत आणि महावितरण प्रशासनासोबत समतोल संवाद साधून ग्राहकांचा सेतू म्हणून कामगिरी बजावली. त्यांच्या अभ्यासपूर्ण, कायदेशीर दृष्टिकोनामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आणि पारदर्शक, निस्वार्थी कामकाजाचा आदर्श त्यांनी घालून दिला.
वीज कायद्याचे तज्ज्ञ म्हणून त्यांचे मार्गदर्शन केवळ वीज ग्राहकांपुरते मर्यादित न राहता, वीज कंपन्यांनाही भरीव मार्गदर्शन ठरले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक जटिल तक्रारींना न्याय मिळाला. वीज ग्राहकांच्या न्यायासाठी उभं राहणारा आवाज म्हणून पुजारी यांची ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करूनच महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने त्यांना आता महावितरण कंपनीच्या कोकण झोन (सिंधुदुर्ग सर्कल) या महत्त्वाच्या झोनसाठी पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे कोकण झोनातील हजारो वीज ग्राहकांना न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
वीज क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले प्रशांत शरदराव पुजारी यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून, संपूर्ण समाजाचा सन्मानच आहे.
