Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

स्मार्ट चॅम्प्स टाकळीच्या स्वप्नाली पाटील यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड प्रदान..



 स्मार्ट चॅम्प्स टाकळीच्या स्वप्नाली पाटील यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड प्रदान..

      इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड पार पडला.

       यावर्षीचा बेस्ट प्रिन्सिपल म्हणून स्मार्ट चॅम्प्स टाकळी इंग्लिश मीडियम स्कूल सैनिक टाकळीच्या सौ. स्वप्नाली संदीप पाटील यांना कोल्हापूर जिल्हा, पालक मंत्री आणि आरोग्य मंत्री मा. आबिटकर साहेब यांच्या हस्ते  आणि प्राथमिक  शिक्षण अधिकारी मीना शेंडकर मॅडम व माध्यमिक  शिक्षण अधिकारी सावंत मॅडम, इंग्लिश मीडियम असोसिएशन (EMAS) चे पदाधिकारी या मान्यवरांच्या  प्रमुख उपस्थितीत मानपत्र  प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक, शिक्षक, पालक आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. 

        हा अवॉर्ड  खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला मिळाल्याबद्दल सौ. स्वप्नाली पाटील मॅडम यांच्यावर समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे .