Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

हॅपी स्कूलच्या मधुरा देशपांडे इन्स्पायर टीचर अवॉर्डने सन्मानित

 


दत्तवाड _

हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळच्या प्रिन्सिपल मधुरा मकरंद देशपांडे यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोशियनचा इन्स्पायर टीचर अवॉर्ड कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, सुवर्णा सावंत यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी मध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात त्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन मधुरा देशपांडे यांना फेटा मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इम्सा) कोल्हापूर यांच्यामार्फत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला  पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रिन्सिपल व शिक्षकांचा   सन्मान करण्यात आला 

यावेळी असोसिएशनचे राज्यसचिव प्रभाकर हेरवाडे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे अमर सरनाईक नितीन पाटील जिल्हाध्यक्ष के डी पाटील संस्थापक अध्यक्ष महेश पोळ सचिन नाईक यांच्यासह जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.