Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बांबरवाडीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सरबताची पाककृती

 


बांबरवाडीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सरबताची पाककृती

दत्तवाड:प्रतिनिधी :जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये केवळ ज्ञानामृतच पाजले जात नाही तर जीवनात उपयुक्त अशा कला, कृती, प्रात्यक्षिक समावेशित उपक्रम राबविले जातात.

         विद्या मंदिर बांबरवाडी शाळेत बुधवारी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले गेले. मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे व अध्यापक निलेश माने यांच्या संकल्पनेतून लिंबू सरबत तयार करण्याची पाककृती राबविली गेली. शाळेतील बागेत असलेल्या लिंबाच्या झाडाला लिंबू लगडलेली होती. विद्यार्थांनी लिंबू सरबत करण्याची इच्छा व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी साखर,मीठ आणले. अन लिंबू सरबताच्या पाककृतीस सुरुवात झाली.प्रत्येक टप्प्यानुसार केलेल्या कृतीचे निरीक्षण करीत शेवटी लिंबू सरबताचा आस्वाद सर्वांनी घेतला.या प्रसंगी पत्रकार मिलिंद देशपांडे व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.