दत्तवाडची कन्या लेफ्टनंट प्रियंका खोत यांचा नागरी सत्कार व मिरवणूक.
दत्तवाडची कन्या लेफ्टनंट प्रियंका खोत यांचा नागरी सत्कार व मिरवणूक.
दत्तवाड:प्रतिनिधी :शिरोळ तालुक्यातील दतवाड गावची कन्या प्रियंका निलेश खोत हिची शुक्रवारी सायंकाळी दत्तवाड गावातून बसवेश्वर सर्कलपासून हलगीच्या वाद्यात व जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.गांधी चौकात मिरवणूक आल्यानंतर ग्रामपंचायत दत्तवाडच्या वतीने सरपंच चंद्रकांत कांबळे,ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील,संजय पाटील,गुरूदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले,माजी उपसरपंच राजू पाटील,पोलिस पाटील संजय पाटील, राजू उर्फ बसगौंडा पाटील सुळकुडे, प्रभू चौगुले,माजी सैनिक संघटनेचे अशोक नेर्ले,अजित वठारे, सुभेदार मेजर ईलाई नदाफ,रजपूत, दत्तवाड पत्रकार संघ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मेन रोडवरुन दत्त मंदिर मार्ग वरून निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.निवासस्थानी ही विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आले.ठिकठिकाणी सुहासिनींच्या वतीने पाणी घालून औक्षण करण्यात आले.
लेफ्टनंट प्रियंका खोत यांनी पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले.चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली आहे.प्रथमतःच जन्मगावी परतल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.प्रियंकाने या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले आहे.
आकस्मिक संकटात खचून न जाता प्रियांका यांनी पतीच्या स्मृती जपण्या साठीच सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता जिद्दीने प्रयत्न करुन त्यांनी आपलं ध्येय साध्य केलं आहे.त्यांचे कौतुक संपूर्ण गावातून होत आहे.
