Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाडात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा व विशेष गावसभा संपन्न.



 दत्तवाडात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा व विशेष गावसभा संपन्न.

दत्तवाड:प्रतिनिधी :१७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत समृध्द पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाड येथे कार्यशाळा व विशेष गाव सभा रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात पार पडली.



            ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ अखेर मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविणेत येणार आहे.या अभियांना तर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती,पंचायत समिती,जिल्हा परिषदांना तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे.

     


  आळस झटकून ग्रामस्थांनी, युवक मंडळे,बचत गट व महिलांनी या अभियानात सहभागी होवून हातभार लावण्याचे आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केले.

 


        

  दत्तवाडातील १४० बचत गट सहकार्य करणार आहेत.स्पर्धेविषयी करावयाची कार्यवाही संदर्भात ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी माहिती दिली.

            सुशासन युक्त पंचायत,सक्षम पंचायत, जलसमृध्द व हरित गाव, मनरेगा व इतर योजना,गाव पातळीवरील,उपजिविका विकास व सामाजिक न्याय,लोकसहभाग व श्रमदान,नाविण्य पूर्ण उपक्रम यावर१०० गुणांचे गुणांकन होणार आहे.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. लेफ्टनंट प्रियांका खोत यांचा अभिनंदन करण्यात आले.पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे अभिवचन माजी उपसरपंच राजगोंडा पाटील यांनी दिले.

समुद्र कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. 

          यावेळी मुख्याध्यापक सतिश यळगुडे,दिलीप शिरढोणे,उपसरपंच रफिक मुल्ला,कुमार सिदनाळे,पत्रकार मिलिंद देशपांडे,ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील,संगीता विभूते,करीश्मा शिंदे,सुप्रिया पाटील,सूर्यकांत चौगुले, मंडल अधिकारी नितीन कांबळे,ग्राम महसूल अधिकारी मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.

          या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अकबर काले,नाना नेजे,सीमा पाटील, अनिता कड़ाके, मनिषा चौगुले,राजू पाटील,अॅड.युवराज घोरपडे,नंदकुमार घोडके यांचे सह नागरिक,बचत गट,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.