दत्तवाड मंडल अंतर्गत फेरफार आदालत संपन्न
दत्तवाड मंडल अंतर्गत फेरफार आदालत संपन्न
दत्तवाड -
दतवाड मंडल अंतर्गत येणाऱ्या दतवाड, घोसरवाड, दोन्ही दानवाड , टाकळी टाकळीवाडी राजापूर राजापूर वाडी खिद्रापूर या गावातील नागरिकांचे फेरफार अदालत संपन्न झाली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रीय नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर पर्यंत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्या अंतर्गत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे, यामध्ये मंगळवार दिनांक २३ रोजी फेरफार आदालत घेण्यात आली यावेळी नागरिकांना सातबारा व फेरफार उतारे वितरित करण्यात आले.
यावेळी मंडल अधिकारी नितीन कांबळे दत्तवाडचे ग्राम महसूल अधिकारी आय.एम मुजावर घोसरवाडचे महसूल अधिकारी जे. एस. मेटकर , दानवाडचे ग्राम महसूल अधिकारी संपदा कांरडे, टाकळीचे ग्राम महसूल अधिकारी राहूल सनदी, राजापूर चे ग्राम महसूल अधिकारी सुरज माने , यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
