Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कुमार घोसरवाड शाळेस दैनिक सकाळ रिलीफ फंडातून ५ लाखांची मदत.

 

कुमार घोसरवाड शाळेस दैनिक सकाळ रिलीफ फंडातून ५ लाखांची मदत.

दत्तवाड:प्रतिनिधी :दैनिक सकाळ रिलीफ


फंड यांचेकडून कुमार विद्या मंदिर घोसरवाड शाळेच्या रुफ कामासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश 
मुख्य कार्यपालन अधिकारी सकाळ वृत्तपत्र समूहाचे श्रीमंत महेंद्रसिंग पिसाळ यांचे शुभहस्ते व राहूल गरड,श्रीमंत भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत देण्यात आला.बुधवार पेठ येथील दैनिक सकाळ कार्यालयात धनादेश देण्यात आला.

           दत्तवाड चे श्रीमंत भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्या विशेष प्रयत्नातून सदरची मदत मिळाली.आतापर्यंत अनेक शाळा, युवक मंडळे,समाजातील व्यक्ती यांना मदत मिळवून दिली आहे. यापूर्वी कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळेलाही मदत मिळवून दिली आहे.

         याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सतिश चव्हाण,केंद्रप्रमुख सुभाष कुरंदवाडे, मुख्याध्यापक दत्ता कमते,लखन खोत,राजू ढोणे,अक्षय नाईक उपस्थित होते.