स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासणे हे संस्थेचे ध्येय - चेअरमन बबनराव चौगुले
स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासणे हे संस्थेचे ध्येय - चेअरमन बबनराव चौगुले
दत्तवाड -
स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासणे हे संस्थेचे ध्येय असून गेली वीस वर्ष लक्ष्मी ग्रामीण बिगर पतसंस्था चे संचालक ते जोपासत असून सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बबनराव चौगुले यांनी काढले ते संस्थेच्या विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
येथील देशभक्त रत्न कुंभार सभागृहात श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर सहकारी शेती पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. संस्थेचे एकूण ८१३ सभासद असून वार्षिक उलाढाल ३५,४१,२८,५१८ रुपये आहे.तर ठेवी ६.७९.३१.१२३ रूपये आहे. या आर्थिक वर्षात ७,१७.२२३ निवळ नफा झाला असून दहा टक्के लाभांशची सभासदांना देण्यात येणार आहे. ऑडिट वर्ग अ देण्यात आला आहे.
प्रथम फोटो पूजन व दीप प्रज्वलन सदगुरू बाबा महाराज मठाचे पिठाधीश ऋषिकेशानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी , दतवाडची कन्या प्रियांका खोत हिची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला तर शैक्षणिक, खेळ, व इतर प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला.
सभासद हे बहुतांशी शेतकरी असल्याने त्यांना गुरुदत्त शुगरचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे यांनी ऊस शेतीला उपयुक्त खते व त्याचे नियोजन यासंबंधी तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग या विषयी माहिती दिली.
यावेळी सुभाष शिरहट्टी, बाबगोंडा पाटील, उत्तम कांबळे ,अजित वठारे आर .बी. सूर्यवंशी, प्रकाश परीट दानवाड यांच्यासह सभासदांनी मनोगते व्यक्त केली.
प्रथम स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केले ठरावाचे वाचन मॅनेजर मल्लिनाथ कल्याणनावर यांनी केले तर आभार सूर्यकांत चौगुले यांनी मानले यावेळी ए सी पाटील ,अशोक नेरले सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





