शाळेच्या भौतिक गरजा पुरविण्यात कमी पडणार नाही : सरपंच डॉ.सी.डी. पाटील
शाळेच्या भौतिक गरजा पुरविण्यात कमी पडणार नाही : सरपंच डॉ.सी.डी. पाटील
श्रीमती पुष्पा बाबर सदिच्छा समारंभ
दत्तवाड: देशपांडे- दनवाड:पदोन्नती,आर्थिक नुकसान सहन करुन श्रीमती पुष्पा बाबर यांनी गावची,शाळेची सेवा केलात याचा सार्थ अभिमान वाटतो.असे गौरवोद्गार नवे दानवाडचे सरपंच डॉ.सी.डी. पाटील यांनी काढले. ते पुढे म्हणाले की शाळेच्या भौतिक गरजा पुरविण्यात आम्ही कमी पडणार नसल्याचे सांगून गुणवत्ता वाढीची अपेक्षा व्यक्त केली.श्रीमती पुष्पा वसंत बाबर यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन सरपंच सी.डी.पाटील बोलत होते.
बाबर मॅडम स्पष्टवक्तेपणासाठी परिचित असून त्यांचे अध्यापनाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. विद्यार्थ्यांकडून काही गोष्टी घडवून घेण्याबाबत त्या दक्ष होत्या.शाळेच्या कामकाजाबाबत,वक्तशीरपणा हा आदर्श घेण्यासारखा असल्याचे गौरवोद्गार केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी काढले.
कुटुंबवत्सल,धीरोदात्त व शिस्तप्रिय असणाऱ्या बाबर मॅडम नी नवे दानवाड शाळेच्या नावारुपात भर घातली असे सेवानिवृत केंद्र प्रमुख संजय निकम यांनी मनोगतात व्यक्त केले.
निरोप मूर्ती श्रीमती पुष्पा बाबर यांनी धीरोदात्तपणे प्रत्येक संकटावर मात करुन मुलांना सुसंस्कारीत केले. यासाठी सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांची प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
दत्तात्रय कमते,राजू जुगळे,मारूती कोळी,मदनकुमार कांबळे,सतिश यळगुडे,कुमार सिदनाळे,प्रकाश भापकर,बाळू यादव यांनी मनोगतातून बाबर मॅडमांचा गुणगौरव केला.
मुख्याध्यापक आनंदा साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन विद्या सुतार यांनी केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष महेश अंबुपे,रवी सुतार,सारिका परीट,सरिता जाधव,निर्मला चौगुले, पूनम साळुंखे,डॉ.अमोल अंबूपे,सूर्यकांत बेरड,प्रल्हाद साळुंखे, सहदेव माळी,दिलीप शिरढोणे यांच्यासह श्रीमती पुष्पा बाबर यांचे कुटुंबिय, नातेवाईक,ग्रामस्थ,मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
मुख्याध्यापक आनंदा साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आभार प्रतिभा मलकाने यांनी मानले. सूत्रसंचलन विद्या सुतार यांनी केले.

