चनगोंडा क पाटील श्री हनुमान दूध व्यवसायिक सहकारी संस्थेमार्फत दूध फरक बील वाटप
दत्तवाड -
येथील चनगोंडा क पाटील श्री हनुमान दूध व्यवसायिक सहकारी संस्थेमार्फत एकूण
सात लाख वीस हजार तीनशे रुपये फरक बिल दूध उत्पादकांत वाटप करण्यात आले.
संस्थेमार्फत दरवर्षी भेटवस्तू व जास्तीचा फरक बिल देण्याची परंपरा असून यावर्षी गोकुळ कडून डिबेन्चर कपात करून देखील संस्थेने स्वतःच्या फायद्यातील रक्कम घालून सभासदांना जादाची रक्कम दिली आहे .
म्हैस दुध साठी साडेनऊ टक्के तर गाय दुधासाठी सहा टक्के फरक बिल देण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन बाबासो पाटील, संचालक राजगोंडा पाटील, संचालक अशोक पाटील ,यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेविषयी इत्यंभूत माहिती सांगून संस्थेच्या सभासदांच्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना बद्दल माहिती दिली. आभार तेजस वराळे यांनी मानले. यावेळी संचालक आण्णासो पाटील, दौलत माने, सागर झुनके, सिद्धगोंडा पाटील, खेमलापुरे, प्रकाश पाटील, सचिव महादेव मटाले, रामचंद्र पाटील, ऑडिटर रमेश कुमार मिठारे, दूध उत्पादक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
