दत्तवाड काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी राधा उदय पाटील यांना उमेदवारी देण्याची जनतेतून मागणी
दत्तवाड काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी राधा उदय पाटील यांना उमेदवारी देण्याची जनतेतून मागणी
दत्तवाड
दत्तवाड हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असून याआधी झालेल्या सर्व निवडणुकीत येथून काँग्रेसनेच बाजी मारली आहे. चनगौडा .क. पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यानंतर सलग बंडा माने यांनी दोन वेळा काँग्रेस पक्षाच्या तर त्यांच्या निधनानंतर त्यांचा नातू प्रवीण माने यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत हा गड राखला होता.
याबरोबरच अपवाद वगळता दतवाड व टाकळी हे पंचायत समितीचे मतदार संघ देखील काँग्रेस याच पक्षाकडे सातत्याने राहिले आहेत.
त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महिला सर्वसाधारण गटातून राधा उदय पाटील या मतदारसंघाला योग्य उमेदवार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. या मतदारसंघातील राजापूर हे त्यांचे माहेर असून लहानपणापासून त्यांना समाजकारण व राजकारणाचे धडे त्यांच्या माहेरातून मिळाले आहेत तर लग्न झाल्यानंतर दत्तवाड येथील पाटील कुटुंबात त्यांचे सासरे दत्तवाडचे सरपंच तर चुलत सासरे उपसरपंच तर सासू ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच होत्या. त्यांचे पती उदय पाटील हे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस युवक सरचिटणीस पदावर कार्यरत असून सामाजिक सहकार शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या संपर्काचा यांना फायदा होणार आहे. त्यामुळे सासर व माहेर या दोन्ही घरातून त्यांना समाजकारण राजकारणाचा वसा मिळाला असून यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार असल्याने काँग्रेस पक्षाने त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
