Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ पंचायत समिती दत्तवाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार – राकेश कागले*

 


*शिरोळ पंचायत समिती दत्तवाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार –  राकेश कागले*

घोसरवाड (प्रतिनिधी): आगामी पंचायत समिती निवडणुकीत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राकेश उर्फ अमोल कागले   दत्तवाड पंचायत  समिती निवडणूक लढविण्याची घोषणा करताच स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मागील ग्रामपंचायत  निवडणुकीत प्रभावी लढत देत जनतेचा मोठा प्रतिसाद मिळवणाऱ्या राकेश   यांना  जनतेच्या आशीर्वादाने पंचायत समिती मध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे.यावेळी बोलताना कागले म्हणाले की, “मागील ग्रामपंचायत समिती निवडणुकीत जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. गावपातळीवरील पाणी, रस्ते, शिक्षण, शेती, आरोग्य या सर्वच विषयांवर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम ठरलो आहोत.त्यामुळे या कामाचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा जनतेला प्रत्यय आला आहे. जनतेतूनच आता पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी होत आहे.” दत्तवाड पंचायत समिती मतदार संघातील इतर गावांमध्ये  राकेश कागले यांचा मित्र परिवार आणि सामाजिक व राजकीय ओळखी असल्याने मतदार संघातील इतर गावातून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे .स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असताना राकेश उर्फ अमोल कागले  यांनी ग्रामपातळीवरील लोकसंपर्क, बैठका आणि जनसंवाद यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, “जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहे,” असे राकेश उर्फ अमोल कागले  यांनी ठामपणे सांगितले. दत्तवाड घोसरवाड परिसरातील विकासाच्या दृष्टीने रस्ते, सिंचन, शैक्षणिक सुविधा, महिला बचत गटांची बळकटी, शेतकऱ्यांसाठी ठोस योजना या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या घोषणेमुळे हलचल निर्माण झाली असून, दत्तवाड पंचायत समिती गटात ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून दत्तवाड मतदारसंघात राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. कागले यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत आबा पाटील स रूडकर व विधानसभा निवडणुकीत गणपतराव दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे यामुळे जनतेतून व कार्यकर्ते यांच्यातून राकेश कागले यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे कागले यांच्या सामाजिक व राजकीय लोकसंपर्क चांगला असल्याने ते पंचायत समितीवर नक्की निवडून येतील असा जनतेचा विश्वास निर्माण झाला आहे यामुळे राकेश कागले यांना संधी द्यावी असा जोर जनतेतून होत आहे