Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

भरत खोत यांनी १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल वर्गमित्र २००४ तर्फे सत्कार

 


भरत खोत यांनी १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल वर्गमित्र २००४ तर्फे सत्कार 

टाकळीवाडी प्रतिनिधी 

टाकळीवाडी तालुका शिरोळ सुपुत्र भरत तानाजी खोत हे सन 2008 यावर्षी सैन्य दलात भरती झाले. यांचे ट्रेनिंग मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव या ठिकाणी ९ महिने प्रशिक्षण पूर्ण केले.

प्रशिक्षण नंतर प्रथम त्यांची अरुणाचल प्रदेश राज्यात बदली झाली. 



तसेच पुणे, सिक्कीम ,जम्मू काश्मीर, पाकिस्तान बॉर्डर, राजस्थान, गुजरात,बेळगाव येथे आपली देश सेवा बजावली.

नायक या पदावरून ते 17 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. घरची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा परिस्थितीवर मात करत सैन्य दलात भरती झाले. 

31 ऑक्टोबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. गावामध्ये यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावातील सैनिक असोसिएशन यांच्यातर्फे मोठ्या उत्साहाने गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी वर्गमित्र 2004, सैनिक असोसिएशनचे सर्व आजी-माजी सैनिक, समस्त गावकरी, मित्रमंडळी, पाहुणे, या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सहभागी होते.