न्यू सनी गणेशोत्सव मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्षात विधायक कार्य
न्यू सनी गणेशोत्सव मंडळाचे
रौप्यमहोत्सवी वर्षात विधायक कार्य
दत्तवाड:प्रतिनिधी :सामाजिक भान ठेवून लोकोपयोगी विधायक कार्य करणारी गणोशोत्सव मंडळे सध्या दुर्मिळ झाली आहेत.कोणताही डामडौल न करता सेवावृत्तीने काम करणारे दत्तवाड ता.शिरोळ येथील रौप्यमहोत्सवी न्यू सनी गणेशोत्सव मंडळ यापैकीच एक आहे.या मंडळाचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार दिलीप शिरढोणे यांनी काढले.विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेत मंडळाचे वतीने वजनकाटा प्रदान कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की या वर्षी न्यू सनी गणेशोत्सव मंडळ रौप्यमहोत्सव साजरा करीत असताना पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला तसेच समाजप्रबोधनासाठी प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करुन समाजप्रबोधनाचा एक वेगळा ठसा उमटविला.इतकेच नव्हे तर दत्तवाड मधील शाळांना उपयोगी साहित्य वितरण केले.विद्या मंदिर बांबरवाडी व कुमार शाळेस शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य व धान्यादी मालाच्या वजनासाठी इलेक्ट्रिक वजनकाटा, केंद्रीय कन्या शाळेस कराओके साऊंड सिस्टीम तर उर्दू शाळेस शालेय साहित्य वाटप करण्यात आले.त्यांच्या या विधायक कार्याचे दत्तवाड परिसरातून कौतुक होत आहे.
विद्या मंदिर बांबरवाडी येथील इलेक्ट्रीक वजनकाटा प्रदान कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला.याप्रसंगी सरपंच सौ.अनिता कडाके,ग्राम पंचायत सदस्या सौ.सीमा प्रमोद पाटील,माजी उपसरपंच दिलीप चव्हाण,सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संजय निकम,कुमार सिदनाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील (बाळगोण्णावर),कल्लाप्पा कडाके,
न्यू सनी गणेशोत्सव मंडळाचे प्रज्योत सिदनाळे,महेश हेमगिरे,योगेश दानवाडे, वैभव गळगे,अक्षय धोतरे,अमोल मुधाळे, संदेश कमते,पार्थ सिदनाळे,शुभम व्हसकले यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.स्वागत मुख्याध्यापिका रुकसाना नदाफ यांनी केले तर आभार निलेश माने यांनी मानले.

