Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दिलीप शिरढोणे यांचे कार्य उल्लेखनीय : संजय निकम.

 


दिलीप शिरढोणे यांचे कार्य उल्लेखनीय : संजय निकम.

दत्तवाड:प्रतिनिधी :विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक म्हणून दिलीप शिरढोणे यांनी उल्लेखनीय कार्य केल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संजय निकम यांनी काढले. शाळा व्यवस्थापन समिती बांबरवाडी दत्तवाड,ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा प्रमोद पाटील व संजय निकम यांच्या वतीने आयोजित दिलीप शिरढोणे यांच्या सदिच्छा सत्कार समारंभात बोलत होते.

          अंगणवाडी सेविका सौ.रेखा पांडुरंग चव्हाण यांनी दिलीप शिरढोणे यांनी केलेल्या सर्व घटकांना मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

             याप्रसंगी सरपंच सौ.अनिता कडाके, ग्राम पंचायत सदस्या सौ.सीमा प्रमोद पाटील, माजी उपसरपंच दिलीप चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील( बाळगोण्णावर),कल्लाप्पा कडाके,कुमार सिदनाळे,न्यू सनी गणेशोत्सव मंडळाचे प्रज्योत सिदनाळे, महेश हेमगिरे,योगेश दानवाडे,वैभव गळगे,अक्षय धोतरे,अमोल मुधाळे, संदेश कमते,पार्थ सिदनाळे,शुभम व्हसकल्ले,मुख्याध्यापिका रुकसाना नदाफ,निलेश माने यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.