Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड साठी दिलीप शिरढोणे यांनी योगदान द्यावे :सुरेश पाटील दत्तवाड काँग्रेस कमिटी मार्फत सत्कार.

 


दत्तवाड साठी दिलीप शिरढोणे यांनी योगदान द्यावे :सुरेश पाटील

 दत्तवाड काँग्रेस कमिटी मार्फत सत्कार.

दत्तवाड: प्रतिनिधी: विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य उल्लेखनीय असून यापुढील काळातही दत्तवाड गावासाठी त्यांनी योगदान देण्याचे आवाहन स्वर्गीय बंडा आप्पा माने पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील (बाळगोण्णावर) यांनी केले.दत्तवाड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दिलीप शिरढोणे यांच्या बदली निमित्त सदिच्छा देताना कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे बोलत होते.

         उपस्थित मान्यवरांनी दिलीप शिरढोणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

       याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस उदय काकासो पाटील,ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील,शिव पार्वती दूध संस्थेचे चेअरमन बसगोंडा पाटील,काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुका उपाध्यक्ष सूरज शिंगे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित माने,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील (बाळगोण्णावर),कन्या विद्या मंदिर हेरवाड चे मुख्याध्यापक सुभाष तराळ,बाबालाल बाणदार उपस्थित होते.