दतवाड स्वाभिमानीच्या पाठपुरावाला यश
दतवाड स्वाभिमानीच्या पाठपुरावाला यश
दत्तवाड -
दतवाड ता. शिरोळ येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्राच्या ताब्यात असणाऱ्या शेवटच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरवाजांची आवश्यकता होती स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष विवेक चौगुले व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण मागणी करून लोखंडे दरवाजे बसविण्यात आले. यासाठी दहा लाख 16 हजार रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे दत्तवाड येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.
राजू शेट्टी आमदार झाल्यानंतर दत्तवाड येथे महाराष्ट्राच्या ताब्यातील बंधारा बांधावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश येऊन येथे दूधगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. यातील पाणी अडवण्याचे दरवाजे 19 व 21 चा महापूर यामुळे खराब झाले होते काही चोरीच गेली होते. पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे खात्याकडे सातत्याने मागणी करून या दरवाज्यासाठी दहा लाख 16 हजार चा निधी मंजूर करून घेतला व या कामाची पूर्तता केली .
यासाठी पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे शाखा अधिकारी राजेंद्र आरगे यांनी सहकार्य केले.
या दरवाजामुळे शेतीच्या पाण्याची सोय होणार असून याचा फायदा दत्तवाड सह एकसंबा मलिकवाड येथील शेतकऱ्यांना होणार आहे..
राजू शेट्टी आमदार झाल्यानंतर दत्तवाड येथे महाराष्ट्राच्या ताब्यातील बंधारा बांधावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश येऊन येथे दूधगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. यातील पाणी अडवण्याचे दरवाजे 19 व 21 चा महापूर यामुळे खराब झाले होते काही चोरीच गेली होते. पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे खात्याकडे सातत्याने मागणी करून या दरवाज्यासाठी दहा लाख 16 हजार चा निधी मंजूर करून घेतला व या कामाची पूर्तता केली .
यासाठी पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे शाखा अधिकारी राजेंद्र आरगे यांनी सहकार्य केले.
या दरवाजामुळे शेतीच्या पाण्याची सोय होणार असून याचा फायदा दत्तवाड सह एकसंबा मलिकवाड येथील शेतकऱ्यांना होणार आहे.