दत्तवाड येथे रविवारी रंगणार खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम* *सौ राधा उर्फ दिपाली उदय पाटील यांचा उपक्रम*
*दत्तवाड येथे रविवारी रंगणार खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम*
*सौ राधा उर्फ दिपाली उदय पाटील यांचा उपक्रम*
दत्तवाड -आगामी जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार राधा उर्फ दिपाली उदय पाटील यांच्यामार्फत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व महिलांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात अहवान आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते उदय काकासो पाटील यांच्या पत्नी राधा उर्फ दिपाली उदय पाटील या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवणार आहे या निवडणुकीच्या तयारीसाठी व महिलांना व्यासपीठ मिळावे यासाठी होम मिनिस्टर हा रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये भाग घेणाऱ्या व कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात येणार आहे.
गांधी चौक दतवाड येथे होणाऱ्या या रंगतदार कार्यक्रमासाठी दत्त कारखान्याच्या संचालिका अस्मिता पाटील, संपदा पाटील, डॉ. अनिता पाटील, संध्या पाटील, एकसंबाच्या स्वप्नाली हुकिरे, गायत्री पाटील, दिपाली नितीन बागे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर माजी सभापती मिनाज जमादार, सरपंच अनिता कडाके, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील ,सीमा पाटील, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार ,माजी सरपंच लक्ष्मी माने ,लता माने, प्रगती घोरपडे ,गायत्री कुरुंदवाडे योगिता घुले ,संगीता झुणके, मंगला मोहिते, अनिता शिंगे, या उपस्थित राहणार असून स्फूर्ती महिला मंच दत्तवाड यांनी विशेष आयोजन केले आहे.
या रंगतदार कार्यक्रमात सर्व महिलांनी सहभाग घ्यावा असे अहवाण राधा उर्फ दिपाली पाटील यांनी केले आहे.


