दत्तवाडात रक्तदान शिबिर संपन्न. सत्यसाईबाबा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
दत्तवाडात रक्तदान शिबिर संपन्न.
सत्यसाईबाबा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन.
दत्तवाड:प्रतिनिधी :भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भगवान श्री सत्यसाई आध्यात्मिक ग्रामीण सेवा केंद्र दत्तवाड यांच्या वतीने व संजीवन ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर साई मंदिर दत्तवाड येथे संपन्न झाले. या रक्तदान शिबीरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.
यासाठी संजीवन ब्लड बॅंक कोल्हापूर चे अतुल नरके,डॉ.ऋषी शिंगाडे,स्पृहा साळसकर,श्रध्दा तळेकर, वैष्णवी पाटील,अमोल गुरव यांच्या टीमचे व भगवान श्री सत्यसाई सेवा समिती दत्तवाड च्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
