Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

राधा उर्फ दिपाली पाटील यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा तुफान प्रतिसाद

 


राधा उर्फ दिपाली पाटील यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला  महिलांचा तुफान प्रतिसाद 

दत्तवाड- दत्तवाड येथे झालेल्या राधा उर्फ दिपाली पाटील यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला यात एकूण 24 बक्षिसे देण्यात आली .

 दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील  प्रमुख उपस्थित होते.



तर स्वप्नाली हुक्किरे सरपंच अनिता कडाके  यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

गांधी चौक  येथे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय क्रमांकास सेमी पैठणी व तिथे क्रमांकास पाटीवर ब्रँडेड साडी प्रदान करण्यात आली तर याबरोबरच मिक्सर, फॅन कुकर , प्रेस मशीन आरती सेट , किटली ,  डिनर सेट अशा विविध चोवीस वस्तूंचे बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले. 

महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी उदय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

एन एस पाटील मलगोडा पाटील, वीरुपाक्ष हेरवाडे, युवराज घोरपडे, दत्त कारखान्याच्या संचालिका अस्मिता पाटील, संपदा पाटील, डॉ. अनिता पाटील, संध्या पाटील, एकसंबाच्या स्वप्नाली हुकिरे, गायत्री पाटील, दिपाली नितीन बागे . तर माजी सभापती मिनाज जमादार, सरपंच अनिता कडाके, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील ,सीमा पाटील, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार ,माजी सरपंच लक्ष्मी माने ,लता माने, प्रगती घोरपडे ,गायत्री कुरुंदवाडे योगिता घुले ,संगीता झुणके, मंगला मोहिते, अनिता शिंगे, यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

सदर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे स्फूर्ती महिला मंच यांनी संयोजन केले होते.